Monday, October 10, 2016

विजयादशमी

                                                   विजयादशमी
आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो.
महाराष्ट्रात दसर्‍याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची, तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापार्‍यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती

आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो.
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दसर्‍याला `दशहरा’ असे म्हणतात. दश म्हणजे दहा व हरा म्हणजे हरल्या आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीने दाही दिशांवर विजय मिळवलेला असल्याने दाही दिशा देवीच्या नियंत्रणात आलेल्या असतात व शक्‍तीने भारलेल्या असतात. आसुरी शक्‍तींवर दैवी शक्‍तींनी मिळविलेल्या विजयाचा हा दिवस; म्हणून या दिवसाला `विजयादशमी’ असेही म्हणतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करतात.
शमी व आपटा यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व : दसर्‍याला शमीची पाने घरी ठेवून आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची पद्धत आहे. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
१. दसर्‍याला रामतत्त्व व मारुतितत्त्व जास्त प्रमाणात कार्यरत असते.
२. आपल्यात क्षात्रभाव जागृत झाल्यास ही तत्त्वे ग्रहण होण्यास मदत होते.
३. शमीमध्ये तेजकण, तर आपट्यात आप व तेज कण अधिक असतात. (पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश ही पंचतत्त्वे आहेत.)
४. शमीकडून प्रक्षेपित होणार्‍या तेजलहरी आपट्याकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपकणांच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात.
५. जेव्हा आपट्याची पाने सोने म्हणून देतात, तेव्हा तेजलहरी जिवामध्ये आपकणामुळे लगेच झिरपतात व जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो.