Saturday, December 31, 2016
Monday, October 10, 2016
विजयादशमी
विजयादशमी
आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो.
महाराष्ट्रात दसर्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची, तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापार्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती
आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो.
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दसर्याला `दशहरा’ असे म्हणतात. दश म्हणजे दहा व हरा म्हणजे हरल्या आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीने दाही दिशांवर विजय मिळवलेला असल्याने दाही दिशा देवीच्या नियंत्रणात आलेल्या असतात व शक्तीने भारलेल्या असतात. आसुरी शक्तींवर दैवी शक्तींनी मिळविलेल्या विजयाचा हा दिवस; म्हणून या दिवसाला `विजयादशमी’ असेही म्हणतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करतात.
शमी व आपटा यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व : दसर्याला शमीची पाने घरी ठेवून आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची पद्धत आहे. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
१. दसर्याला रामतत्त्व व मारुतितत्त्व जास्त प्रमाणात कार्यरत असते.
२. आपल्यात क्षात्रभाव जागृत झाल्यास ही तत्त्वे ग्रहण होण्यास मदत होते.
३. शमीमध्ये तेजकण, तर आपट्यात आप व तेज कण अधिक असतात. (पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश ही पंचतत्त्वे आहेत.)
४. शमीकडून प्रक्षेपित होणार्या तेजलहरी आपट्याकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपकणांच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात.
५. जेव्हा आपट्याची पाने सोने म्हणून देतात, तेव्हा तेजलहरी जिवामध्ये आपकणामुळे लगेच झिरपतात व जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो.

Thursday, August 25, 2016
आपल्या हिंदू संस्कृतीचे भाग्य किती थोर आहे बघा ज्या संस्कृतीत
मर्यादापुरुषोत्तम राम जन्मला त्याच संस्कृतीत श्रीकृष्णासारखा
पूर्णपुरुषोत्तम युगपुरुषही जन्माला आला. वैयक्तिक नैतिकता म्हणजे काय ते
आपण रामाकडून शिकावे तर सामाजिक एकात्मता म्हणजे काय हे श्रीकृष्णाकडून.
श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना कंसाच्या
बंदिशाळेत,गोकुळात झाला म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी म्हणतात. संपूर्ण
भारतात सर्व ठिकाणी अतिशय उत्साहात हा जन्मदिवस साजरा करतात. या दिवशी
विविध खाद्यपदार्थ दही, दूध, लोणी एकत्र करून कालाविणे म्हणजेच “काला” होय.
यालाच दहीकाला असे म्हणतात. या दिवशी दहीकाला करून खाण्याचा प्रघात आहे.
श्रीकृष्णाचा हा आवडता खाद्यपदार्थ होता.
श्रीकृष्ण श्रीमंत घरात जन्मला असूनदेखील गरीब, दिनदुबळ्या गवळ्यांच्या मुलांमध्ये रमला, बागडला. या मुलांना दूध-दही मिळत नसे तेंव्हा श्रीकृष्ण आपली व सर्व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्याचा काला करून खात असे. श्रीकृष्णाने कधीही गरीब श्रीमंत वा उच्च नीच असा भेदभाव केला नाही. त्याला अर्जुनाबद्दल जितके प्रेम होते तेवढेच सुदाम्याबद्दल आपलेपण होते.ह्यामधूनच समाजाशी एकरूप होण्याचे त्याचे आचरण दिसून येते.

भाविक
मंडळी अष्टमीला उपवास करतात व नवमीला सोडतात. या दिवशी सर्व लहान थोर
मानवी साखळी काढून रस्त्याने मिरवणूक काढतात. तेंव्हा घराघरातून लोक घागरी
भरून त्यांच्यावर पाणी ओततात. ठिकठीकाणी चौकाचौकात बांधलेली दहीहंडी मानवी
मनोरा रचून शाररीक कौशल्याने ती फोडतात ह्या सणातून आपल्याला खेळाचे,
शाररीक कौशल्याचे म्हणजेच आरोग्याचे महत्व पटते. समाजात एकोपा राहण्यासाठी,
प्रेम वाढविण्यासाठी असे खेळ खूप मोलाची भूमिका निभावतात. श्रीकृष्ण तर
दहीहंडी, विटीदांडू, मल्लकुस्ती अशा खेळांचा आद्यपुरस्कर्ता होता. ह्या
सर्व भारतीय खेळांचा प्रसार श्रीकृष्णामुळे सर्वसामान्यांपर्यंत झाला.
श्रीकृष्णाने कर्माचे महत्व गीतेद्वारे सांगून आपल्या कर्तव्यात कधीही
कसूर करू नये हा संदेश समाजाला दिला. श्रीकृष्णाचे संपूर्ण आयुष्य हे
समाजासाठी एक आदर्श होऊन राहिले आहे. त्याने जीवनाच्या सर्व क्षेत्रात
खेळ, समाज, तत्वज्ञान, नैतिकता,कर्तव्य एक आदर्श निर्माण केला आहे. जो
आपल्याला एका दीपस्तंभासारखा दिशा दाखवत राहील.
श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण
नेहमी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करीत रहावे. फळाची किंवा कोणत्याही लाभाची
अपेक्षा ठेवू नये. आसक्तिरहित कर्मच श्रेष्ठ ठरते. अशा या प्रयत्नवादी,
ध्येयवादी पुरुषोत्तमाने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याचा निश्चय करणे
हाच गोकुळाष्टमीचा संदेश आहे.Wednesday, July 20, 2016
Wednesday, July 13, 2016
Wednesday, July 6, 2016
Saturday, June 11, 2016
Tuesday, May 31, 2016
Saturday, May 14, 2016
छत्रपती संभाजी महाराज जयंती
जगातील सर्वात कुशल योद्धा...
' भाषा पंडित '.....
शत्रास्तशास्त्र पारंगत.....
त्यांच्या मृत्युलाही ईतिहासात तोड नाही.
असे संस्कृतपंडित,बुधभूषणकार,
महापराक्रमी,
परमप्रतापी
क्रांतीची प्रेरणा देणारा शिवपुत्र शंभुराजे.....
राजश्रियाविराजीत
सकळगुणमंडळीत
न्यायमूर्ती शिरोरणी
ब्रजसंस्कृत
काव्यशास्त्र पंडीत
सुयोध योध्दा
अजिंक्य शंत्रूंजय
धर्मशास्त्रपंडीत
ज्ञानकोविंद
सर्जा
रणधुरंधर
क्षत्रियकुलावतंस
सुवर्णसिंहासनाधिपती
सर्जा छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या सर्वांना
कोटी कोटी शिवेच्छा !!

Sunday, March 6, 2016
Saturday, February 27, 2016
Monday, February 22, 2016
Saturday, January 30, 2016
Subscribe to:
Posts (Atom)